अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका तरुणाची सेक्स क्लिप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत सहा जणांच्या टोळीने तरुणाला ५ लाखांच्या खंडणीची मागणी करत ५० हजार रुपये उकळले.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील २९ वर्षीय तरुण बीडमध्ये राहतो. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध हाेते. २४ जानेवारी रोजी दोघांच्या प्रणयाची क्लिप तरुणीच्या साथीदारांनी बनवून तरुणाला ५ लाखांची मागणी केली.
तरुणाने घाबरून ५० हजार रुपये दिले मात्र, ५ लाखांसाठी धमकी मिळाल्याने तरुणाने पोलिसांत तक्रार दिल्याने विठ्ठल जाधव (रा. लोळदगाव ता. गेवराई), संतोष चांगण (रा. बीड), विक्की, सोनी, अवि व महिला अशा सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला.