अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे.
यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.
याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पाथर्डी तालुक्यातील सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी अमोल कोरडे (वय 21) रा. शंकरवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. शहापूर ता. नेवासा हिने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सासरी नांदत असताना मला माझे पती अमोल गव्हणनाथ कोरडे,
सासरे गव्हणनाथ किसन कोरडे, सासू मुक्ताबाई गव्हणनाथ कोरडे तिघे रा. शंकरवाडी ता. पाथर्डी, नणंद कविता अनिल करांडे व नंदई अनिल करांडे दोघे रा. देहरे ता. नगर यांनी
वेळोवेळी मला माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी मारहाण केली व घराबाहेर काढून दिले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserveup