अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याचे अनावरण केलं.
मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असल्याचे समोर आलेय.
या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे.
आज राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाअधिवेशनात अनेक राजकीय ठराव संमत केले जाणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे.