लोककलावंत सापडला आर्थिक अडचणीत; शासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  जगभरातच आर्थिक संकट निर्माण झालेले असताना, गावोगाव कला सादरीकरण करून पोट भरणारे लोककलावंत अधिकच अडचणीत सापडले आहेत.

यातही काही घटक उद्या काय होणार या चिंतेने अधिक ग्रासले आहेत. राज्य सरकारने राज्यातील तमाशा कलावंताच्या विविध प्रकारच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि सोडविण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी नामवंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

राज्यातील नामवंत तमाशा कलावंताची बैठक कर्जत तालुक्यातील आंबिजळगांव येथे पार पडली यासाठी राज्यातील अनेक तमाशा कलावंत कर्जत येथे आले होते.

लोककलांनी परंपरेने ज्ञान, लोकसाहित्यातील कथा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या. मात्र, हे लोककलाकार जगले नाहीत तर ही परंपरा नष्ट होईल, अशी भीती आहे.

कोरोना मुळे एक हंगाम वाया गेला यामुळे तमाशा कलावंत आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने तमाशा कलावंताचा विमा उतरवावा, तसेच कलावंतांच्या मुलांना शिक्षणासाठी २ % जागा राखीव ठेवाव्यात.

कलाकारांना दिले जात असलेले अनुदान वेळेत द्यावे, कलाकारांच्या आरोग्या बाबत महत्वाचे निर्णय सरकारने घ्यावेत अशी मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24