दशक्रिया विधी करताना या नियमांचे पालन करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा वाढत संसर्ग जिल्हाभर पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही नियम अटी लागू केल्या आहेत. तसेच आता दशक्रिया विधीसाठी देखील पुरोहित संघाने काही खास नियमावली तयार केली आहे.

कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, या कोरोनाबाधितांचा अंत्यविधी करताना देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन संगमनेर येथील पुरोहित संघाने फलकाच्या माध्यमातून केले आहे.

दशक्रिया विधीसाठी परिवारातील सदस्य व अत्यंतजवळचे मोजकेच नातेवाईक यांची उपस्थिती असावी. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा आणि एकमेकांपासून दूर बसावे. सॅनिटायझरची व्यवस्था आवर्जून करावी.

लहान मुले तसेच वृध्द, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींना विधीसाठी बोलावू नये. परिसरात कोठेही कोणीही थुंकू नये. काही वेळा एकाच वेळी अनेक विधी असतात,

याचे भान बाळगावे समजूतदारपणा दाखवावा, गर्दी वाढणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आदी महत्वाच्या मुद्द्यांचा या फलकात समावेश असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24