अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे ? अशी विचारणा केली आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
जाणुनबुजून कोणी चौकशी करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.
तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं.
त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असे अजित पवार यांनी सांगितले. एकनाथ खडसे प्रवेश बदल काही माहीत नाही आणि शिवेंद्र राजे भेटले ते साताऱ्याच्या काम समभंडात भेट झाली.
कोणी भेटत असत म्हणजे याचा अर्थ काही काळं निळं आहे असा नाही होत असे अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाला राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करणार
राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून संबधित भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
या संकटाच्या काळात पावसामुळे झालेल्या नुकसान भागात, राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करणार,” असल्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved