अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील गटई कामगारांच्या विविध प्रश्नासाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर गटई आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोड यांनी केलेल्या उपोषणाला यश आले आहे.
कष्टकरी गटई बांधवांच्या पीच परवाना, गटई स्टॉल, अतिक्रमण विभागाकडून होणारी चुकीची कारवाई, अपघात विमा, आरोग्य विमा, पेन्शन योजना, घरकुल योजना अशा विविध न्याय-हक्काच्या मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल घेत
पुणे येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सामाजिक न्याय विभाग, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील संबंधित अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सुचना केल्या.
तर लवकरात लवकर गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने शासकीय प्रतिनीधी डांगे व चर्मकार विकास संघाचे पदधिकारी यांच्या हस्ते लिंबु पाणी देऊन संजय बनसोड यांचे उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात जिल्हाध्यक्ष डॉ. किसनराव कांबळे, कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा पाचरणे,
निवृती पाचरणे, शहराध्यक्षा सुनिताताई शिंदे, युवानेते वैभव खैरे, अमोल वाघमारे, निलेश काबंळे, किरण मोरे, मुंबई पदधिकारी राजनंदन चव्हाण, भगवान चिपळुनकर, बाबासाहेब सातपुते, प्रविण सावंत,
प्रतिम देसाई, परशुराम तिखे, बळीराम सोनवणे, फिलिप प्रान्सेस, संतोष चव्हाण, रामदास टिपारे, स्मिताताई शिंदे आदिंसह राज्यातून आलेले चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.