माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची फौजदारी याचिका नागपूर खंडपीठाने खारीज केली. ॲड. सतीश उके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

 

याचिकाकत्र्याच्या मते, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी प्रकरणांचा नामनिर्देशपत्रात उल्लेख केला नाही. त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली.

 

त्यासंदर्भात याचिकाकत्र्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. परंतु या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही.

 

त्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५ -अ व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे, असे याचिकाकत्र्याचे म्हणणे होते.

अहमदनगर लाईव्ह 24