अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट सुरु असतानाच सध्या आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी आजच सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता.
दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे.
अन्यथा रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत,’ असा इशारा माजी मंत्री आणि भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सरकारला दिला आहे.
जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरुन शिंदे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
‘माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस पावले उचलली आहेत. मात्र राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले.
मात्र त्याठिकाणी राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी अपयशी आणि कमकुवत ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळला आहे.
त्यावेळी जे सत्तेत होते, ते आता सरकारमध्ये आहे. मग त्यांनी हा प्रश्न का चिघळवला,’ असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, धनगर आरक्षणाचा प्रश्न मराठा आंदोलनामध्येच सुटला पाहिजे. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved