माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले.

प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवर्तनाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. तारखांचा घोळ करून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

कोरोना महामारीच्या काळात उपोषणाला बसण्यात मला स्वारस्य नाही पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सोशल डिस्टन्ससह इतर शासकीय नियमांचे पालन करून हे आंदोलन झाले.

अनेक दिवसांनंतर प्रा. शिंदे कर्जतला आल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते भेटायला आले होते. आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर,

तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर, अल्लाउद्दीन काझी, काकासाहेब धांडे, पप्पूशेठ धोदाड, सुनील यादव, गणेश पालवे आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24