आगामी होणाऱ्या राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी महापौर दीप चव्हाण यांच्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अहमदनगर महानगर पालिकेचे माजी महापौर व काँग्रेसचे मा. शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीप चव्हाण यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.p

महाराष्ट्र काँग्रेस प्रांताध्यक्ष ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सूचनेवरून सरचिटणीस ॲड. गणेश पाटील यांच्या सहीने सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत दीप चव्हाण यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे,

आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. संजय जगताप यांच्या समवेत राजगुरुनगर नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला व माननीय पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी बद्दल आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24