माजी मंत्री राम शिंदे-आ. रेहित पवार आले एकत्र…..?नेमके काय झाले वाचा….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी चौंडीत एकत्र आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले. दोघांचे एकाचवेळी एकत्र येणे चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

दोघेही एकमेंकावर आरोप – प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. कोरोनाच्या काळही त्यांनी सोडला नाही. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोघेही सकाळी एकत्र आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती साजरी होत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन चौंडीत मोठ्या प्रमाणावर जयंती सोहळा साजरा होतो. दरवर्षी ३१ मे रोजी राज्य व देशभरातील कार्यकर्ते , राज्यकर्ते चौंडीत येतात.

मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राम शिंदे यांनी केले होते. नागरिकांनी घरातच बसून अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आज सकाळी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला महाभिषेक , पुष्प अर्पण कार्यक्रम झाला. त्यानंतर राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकत्र येत अभिवादन केले. अनेक दिवसानंतर शिंदे व पवार आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र पहायला मिळाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24