अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले आहेत.
सुरुवातीला विधानसभा आणि नंतर विधान परिषदेला डावलल्यामुळे खडसे यांनी थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी देखील पक्ष नेतृत्वावर टीका सुरू केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भाने ‘विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षातील इच्छुक, नेते काही शिकतील’, असे विधान केले होते.
याच विधानाचा उल्लेख करून माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केला. (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) जो मला आणि इतरांना जमला नाही…’ असे त्यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com