अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले.
कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी उपोषण सुरू केले यावेळी तालुक्यातुन आलेल्या भाजप कार्यकर्त्यानीही दूर दूर बसून आंदोलनात सहभाग घेतला.
अवघ्या दहा मिनिटात कुकडी प्रकल्प कोळवडी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप व तहसीलदार नानासाहेब आगळे हे चर्चा करण्यासाठी ६ जून ला आवर्तन सुटणार असल्याचे पत्र घेऊन उपस्थित झाले व त्यांनी प्रा राम शिंदे यांचे बरोबर चर्चा केली असता प्रा शिंदे यांनी कुकडीच्या अधिकार्यासमोर विविध प्रश्न उपस्थित केले,
उन्हाळ्याचे तीन आवर्तन सोडणार होतात मग उर्वरित आवर्तन कसे गायब झाले, आवर्तन सोडण्या एवढा पाणी साठा धरणात उपलब्ध आहे का? एडगाव मध्ये २०० एमसीएफटी पाणी असताना ते सोडू शकता का? आपल्या पत्रानुसार ६ जून ला आवर्तन सुटणार आहे व आत्ता आपण पिंपळगाव जोग्यातुन येडगाव धरणात पाणी सोडणार आहेत असे सांगता
मग धरणातून धरणात पाणी सोडण्याला आवर्तन म्हटले जाते काय? गेल्या चार मिटिंग मध्ये सहमती झालेली नसताना २९ मे च्या बैठकीत सर्व सदस्याची सहमती कशी झाली, मग अशी सहमती या अगोदरच का होऊ शकली नाही, कर्जत तालुक्यात नेमके किती तारखेला पाणी येईल असे विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर कुकडीच्या पाणी वितरणातील सावळा गोंधळावर एकदा तरी चर्चा करावी असे म्हणत मतदार संघातील जनतेची शेतकऱ्याची दिशाभूल करू नये असे प्रा शिंदे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews