अहमदनगर Live24 :- कर्जत – जामखेड बारामतीसारखं करणार होते. परंतु बारामतीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला, तर भिलवाडा पॅटर्न राबवला. पण जामखेडमध्ये ११ कोरोनाचे रुग्ण सापडले, पण भिलवडा पॅटर्न का राबवला नाही, जामखेडला सवतीच्या लेकराप्रमाणे वागणूक का?
असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. जिल्ह्यात कोरोनाने लॉकडाऊन सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
रुग्णाची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले. पण जामखेड, नगर शहर, संगमनेर, नेवासे इत्यादी ठिकाणी अधिकचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले.
जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आली. परंतु रात्री जामखेडमध्ये आणखी दोन रुग्णांची वाढ झाली. आता जामखेडमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत ऐकून माझे मन सुन्न झाले.
ज्याप्रमाणे बारामती येथे एक रुग्ण आढळून आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणली.
त्याप्रमाणे जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची गरज आहे. शासनाने व प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®