अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कोरोना महामारीतही उपोषण केले, आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.
स्थानिक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घेतल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे स्वागत करू.
कारण या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार स्थानिक नाही. त्यांच्यापुढे राज्याचे, देशाचे प्रश्न असल्याने त्यांना मतदारसंघाचे प्रश्न माहीत नाहीत.
म्हणून त्यांनी राजेंद्र फाळके किंवा त्यांच्या तत्सम असणाऱ्या स्थानिक नेत्याला विधान परिषदेवर घ्यावे, अशी सूचना प्रा. शिंदेंनी केली.
शिंदे म्हणाले, फाळके यांनी त्यांच्या पक्षासाठी माझ्याविरुद्ध दोनवेळा उमेदवारी केली. तसेच विद्यमान आमदार भेटत नाहीत अशी मतदार संघातील अनेकांची तक्रार आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजेंद्र फाळके यांना संधी दिल्यास स्थानिक असल्याने ते सहज सर्वांना उपलब्ध होतील. या विधानामुळे कर्जत-जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews