माजी आमदार औटी यांनी भुमिका केली स्पष्ट ,म्हणाले बाहेरून येउन कोणी..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश भारतात चहा विक्रीसाठी आले आणि दिडशे वर्षे राज्य करून गेले. त्यांची गुलामगिरी आपल्याला स्विकारावी लागली. गुलामगिरी स्विकारायची नाही, कुणाचीच नाही.

माझं स्वातंत्र, माझा स्वाभिमान, माझी अभिव्यक्ती माझ्याजवळ. बाहेरून येउन कोणी आमचा विकास करण्याची गरज आहे असे मला स्वतःला वाटत नाही.

माझ्या गावातील तरूण पोरांच्या मनगटात ऐवढी रग आहे, आमचा विकास करायला आम्ही समर्थ आहोत, शंभर टक्के समर्थ आहोत. घराघरातील दुःख आम्हाला माहीत आहे.

असे सांगत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी पारनेरकरांना भावनिक साद घालीत आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टिकाश्र सोडले.

शहर विकास आघाडीचे चंद्रकांत चेडे, अर्जून भालेकर यांनाही चिमटे घेत त्यांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक ९ मधील ४८ लाख रूपये खर्चाचे मटण मार्केट,

सत्यम औटी ते सुनिता घंगाळे रस्त्याचे १७ लाख रूपयांचे काँक्रीटीकरण तसेच ३३ लाख ५० हजार रूपये खर्चाचे लेंडीनाला ड्रेनेजलाईन बांधकामांचे लोकार्पण औटी यांच्या हस्ते करण्यात आले,

त्यावेळी माजी आमदार औटी यांनी जाहिर सभेतून आपली भुमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा वर्षा नगरे,

शिवसेनेचे शहर प्रमुख नीलेश खोडदे, महिला आघाडी प्रमुख डॉ. वर्षा पुजारी, अनिकेत औटी, गणपतराव आंबुले, शंकर नगरे, विजय डोळ, शकील शेख, ज्ञानेश्‍वर कुलट,

माजी नगराध्यक्ष सिमा औटी, भरत औटी, नीतीन आडसूळ, माजी सरपंच अण्णा औटी, सखाराम बुगे, राजेंद्र औटी आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24