अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- पिंपळगाव पिसाच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे दिनकर पंदरकर यांच्या पॅनेलच्या सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली.
माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनेलच्या अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव जागेवर असलेल्या सुमन मोरे यांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे पद रद्द केले. त्यामुळे जगताप गटाला मोठा धक्का बसला होता.
आमदार बबनराव पाचपुते यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या पॅनेलतर्फे सुलक्षणा पाडळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंच निवडीकरिता शुक्रवारी विशेष सभा बोलावली, मात्र गणपूर्तीअभावी ती तहकूब करण्यात आली. पुन्हा शनिवारी दुपारी २ वाजता सभा घेण्यात आली.
या सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता नव्हती. पंदरकर गटाचे ६ सदस्य हजर, तर जगताप गटाचे ११ जण गैरहजर राहिले. सरपंचपदी सुलक्षणा पाडळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी म्हणून बेलवंडी मंडलचे सर्कल पी. जे. कांबळे यांनी काम पाहिले. तलाठी स्वप्निल होळकर आणि ग्रामसेवक बी. वाय मेहत्रे यांनी त्यांना मदत केली.
दरम्यान, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडीने माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाला धक्का बसला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews