अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दुरवस्था झालेल्या तपोवन रस्त्याचे काम होण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होऊन साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला.
या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते, परंतु, ठेकेदाराने कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला. गैरव्यवहाराने ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी हे पाप टाकणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या तपोवन रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत राठोड यांनी कामाची चौकशी व तपासणी करण्याची मागणी शासनाकडे केली होती.
त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पुणे कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरीक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी तपोवन रस्त्याची पाहणी केली.
वापरलेले डांबर, खडीकरणाची तपासणी उपनेते अनिल राठोड यांच्या समवेत केली. यावेळी अधीकक्षक अभियंता पेशवे आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, या भागातील नागरिक वारंवार माझ्याकडे या रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी करत आहेत. या भागातील शिवसेनेचे दिगंबर ढवण या रत्याच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews