अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- भाजपा कार्यकर्त्यांनी पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालना दयावी तसेच भाजप पक्ष वाढविण्यासाठी विकास कामातून जनतेचा विश्वास संपादन करावा.
भाजपाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले आहे. त्या योजना तळागाळापर्यत घेवून जाण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे.
पुढील मनपाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा स्वबळावर भाजपाची सत्ता मिळावी. नगरसेवक मा.श्री.मनोज दुलम हा सर्व सामान्य कुटुंबातील आहे. काम करणा-यांना पक्षामध्ये पदाच्या माध्यमातून न्याय दिला जातो.
मा.श्री.मनोज दुलम यांनी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. कोरोनाच्या काळामध्ये सर्व जनता भयभित झाली होती त्यांना आधार देण्याचे काम मा.श्री.मनोज दुलम यांनी केले.
पद भेटल्यानंतर कोणीही हवेत जाण्याचे काम करू नये. पदाला साजेचे असे काम समाजा समोर उभे करून जनतेचा विश्वास संपादन करावा असे प्रतिपादन माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
मनपाच्या सभागृह नेते पदाचा पदभार मा.श्री.मनोज दुलम यांनी माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले यांचे हस्ते स्विकारला यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे,
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे,स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर, महिला बाल कल्याण समितीचे सभापती मा.सौ.लताताई शेळके
, नगरसेवक मा.श्री.रामदास आंधळे, मा.श्री.रविंद्र बारस्कर, माजी नगरसेवक मा.श्री.सुरेंद्र गांधी, मा.श्री.विलास ताठे, मा.श्री.उदय कराळे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.अजय ढोणे,
मा.श्री.संजय वल्लाकटी, मा.श्री.अभिजीत चिप्पा, मा.श्री.राजू मंगलारम आदी उपस्थित होते. यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की,
मनपामध्ये भाजपाची सत्ता असताना सर्वांना बरोबर घेवून शहर विकासाचे काम सुरू आहे. विकास कामामध्ये आम्ही कधीही पक्षीय राजकारण आणले नाही.
सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम यांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी यापुढील काळामध्ये असेच काम करावे असे ते म्हणाले. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे म्हणाले की,
सर्व सामान्य कुटुंबातील मनोज दुलम यांना भाजपाने सभागृह नेते पदी निवड केली आहे. त्यांनी नेहमीच सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.
पद्मशाली समाजालाही पदाच्या माध्यमातून न्याय दिला. असे ते म्हणाले यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती मा.सौ.लताताई शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम म्हणाले की, माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तींला सभागृह नेते पदी विराजमान केलें याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच भाजप पक्ष वाढविण्यासाठी काम करिल माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ करिल असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved