अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रात सत्ता असणार्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मानाचे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता थेट राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे माजी आमदार शिवाराजीराव कर्डिले यांच्या पारड्यात जाण्याचे चिन्हे आहेत. तालुका अध्यक्ष व शहरातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रदेशपातळीवरून तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणूकीची उदया घोषणा होणार आहे. त्यामध्ये कर्डिले यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही त्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे बोलले जाते. 10 जानेवरीला कोहीनूर मंगल कार्यालयात विधानसभा माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे. कर्डिले यांना हे पद दिले तर भाजपचे विखे यांना एक प्रकारचा शह देण्यासाठीच प्रदेशपातळीवरून हा डाव आखलेला असू शकतो, असेच म्हणावे लागेल.
कर्डिले यांनी पक्षात आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले असून त्यांनी माजी मुख्यंमंत्री देवेंद्र डणवीस यांचा दहा वर्षात विश्वास संपादन केला असून ते अतिशय जवळवचे मानले जातात. त्यामुळे त्यांचाही कर्डिले यांना पाठींबा असल्याचे बोलले जाते. या वेळेस तीन जिल्हाध्यक्ष पद जिल्ह्यात देण्यात येणार असून नगर शहरजिल्हाध्यक्षपदासाठी पुन्हा माजी खासदार दिलीप गांधी तर नगर उत्तरेतून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जाते.
सध्या नगर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड असून त्यांनीही चांगले काम केले आहे. परंतु या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. विधासनभेच्या पराभवाला जबाबदार कोण? याबाबत वरिष्ठांकडे अहवाल देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आजी-माजी आमदारांनी जरी विखेंवर खापर फोडले असले तरी पक्षसंघटनाही खिळखिळी झाल्याचे वरिष्ठांकडून बोलले जाते. त्यासाठी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी आवश्यक असल्याचे प्रदेश अध्यक्ष यांनी त्यावेळेसही सांगितले होते.
बेरड यांना चार वर्षांपेक्षा जास्त संधी पक्षाने दिली असून त्यांनीही पक्ष संघटनेसाठी मोठे काम केले आहे. आता नव्या व्यक्तीला संधी देण्याचा विचार प्रदेश अध्यक्षांनी केला आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष या पदावर यापूर्वी का केले आहे. त्यामुळे दक्षिणेतून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची या पदावर वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.
पक्ष डगमगलेला असताना पक्षवाढीला कोण बळ देऊ शकते. व राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना कोणता व्यक्ती खंबीरपणे आव्हान देऊ शकतो तर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेच नाव वरिष्ठांच्या डोळ्यासोर आले आहे. दोन वर्षांवर जिल्हा परिषद व पंचायत सतिमीच्या निवडणूका आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने जुळवाजुळव करण्यासाठी कर्डिले यांचा कोणीच हात धरू शकत नाही. तसेच तीन महीन्यांवर जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आली आहे. यासाठी विखे आणि कर्डिले यांची राजकीय गणिते व डावपेच टाकण्यासाठी पक्षालाही गरज आहे. विखे यांच्याकडे आमदार व खासदार पद असल्याने त्यांना या पदावर किंवा त्यांच्या कोणत्याही पदाधिकार्यांची या पदावर वर्णी लागणार नाही.