माजी खासदार दिलीप गांधीना बाजूला ठेवत भाजप इलेक्शन मोडमध्ये !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगरपंचायत तर जामखेड, शेवगाव मध्ये नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

पारनेर :माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, शेवगाव :-माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत :-माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तर जामखेडसाठी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या वर जबाबदारी देण्यात आली आहे.

सर्व निवडणुका नगर दक्षिणेत होणार आहे. यासाठी भाजपने आजी माजी आमदार नियुक्त केले असले तरी दक्षिणेत तीन वेळा खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना मात्र संघटनेने जबाबदारी सोपवली नाही. याचीही चर्चा पक्ष वर्तुळात होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24