माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई येथे ना. पवार यांची भेट घेऊन यूएसआयएसएमई कौन्सिल इंडियाचे संचालक मायकेल वायदेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांनी या पुरस्काराच्या घोषणेचे पत्र व डॉ. बेन कार्सन यांचे पुस्तक भेट दिली.

तसेच सय्यद साबीर अली यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ना. पवार यांचा मुस्लिम समाज व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गव्हर्नर ऑफ मेरीलँड कडून 2020 या वर्षासाठी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा व नेतृत्वासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मार्च 2021 मध्ये पवार यांना सदर पुरस्कार मेरीलँडचे गव्हर्नर लॅरी होगन यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. यावेळी यू.एस.ए.च्या नगरविकास राज्य सचिव डॉ. कार्सन व अलीशा बॉब पुलिव्हर्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती वायदेंडे व साबीर अली यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24