अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पैशाचे आमिष दाखवून दोन तरुणींना वेश्याव्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
न्यायालयाने त्यांची २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.याप्रकरणी विशाल अशोक देशमुख (३६, रा. दत्तवाडी, पुणे),
संतोष रघुनाथ दारवटकर (४१, रा. नवी पेठ, पुणे), राजन नारायण सावंत (४५, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे), मुन्ना ऊर्फ लक्ष्मण विजय आहेर (२४, रा. गवळीवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत पोलिस शिपाई पुष्पेंद्र देवदास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. २१ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हॉटेल किनारा येथे ही घटना घडली.