अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- मुलामुलींचे लग्नासाठी वयोमर्यदा ठरविण्यात आलेलं आहे. या नियमनाचे उल्लंघन केल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, याचे ज्ञान असूनही एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील सोळा वर्षीय एक मुलगी आपल्या बहिणीकडे लोणीव्यंकनाथ येथे राहत होती.
काही दिवसांपूर्वी तिच्या नातेवाईकांनी सदर अल्पवयीन मुलीस फसवून त्या मुलीचा विवाह मढेवडगाव येथील एका तरुणाशी लावून दिले. संबधित मुलीची बहीण व तिच्या पतीने याबाबत श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क केला.
पोलिसांनी संबधित मुलगी व तिच्या नातेवाईकांना बोलावून घेत विचारपूस केली असता मुलीने लग्न झाले नसून फक्त साखरपुडा झाल्याचे लेखी लिहून दिले.
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या मुलीस नगर येथील शासकीय बाल सुधारगृहाकडे रवाना केले. तिथे त्या मुलीचे समुपदेशन करण्यात आले.
अधिक माहिती दरम्यान त्या मुलीने बालकल्याण समितीसमोर आपला साखरपुडा नाही तर विवाह झाल्याचे सांगितले. चाईल्डलाईन या संस्थेचे प्रवीण कदम ,
पूजा पोपळघट यांनी फिर्यादी यांच्यासमवेत पोलीस ठाणे गाठले. फिर्याद दाखल केली. या चौघांवर गुन्हा दाखल विशाल जगन्नाथ माने (रा.मढेवडगाव), सागर काळे,
शीतल सागर काळे (रा.काळेवाडी, ता. नगर), दत्तात्रय बाबा झेंडे (रा.चिखली) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved