शाळकरी विद्यार्थ्यांना आता मोफत चष्मा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : मोबाईलचा वापर म्‍हणा वा इतर कारणांमुळे राज्‍यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत चालले आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण मुलांपैकी ८ टक्‍के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आहे.

हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवण्यात येणार आहेत. राज्‍य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते.

या वर्षात ११९५ वैद्यकीय पथके यासाठी कार्यरत असून त्यांच्या तपासणीत दृष्टिदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. शाळांमध्ये १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ इतकी मुले शिकत असून दृष्टिदोषाचे प्रमाण ८ टक्के इतके आहे. या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल.

एका चष्म्याची सरासरी किंमत २०० रुपये असून २५ टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठीदेखील खर्च अपेक्षित आहे.सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टिदोष असलेल्या मुलांना त्‍यांच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहोचवण्यात येईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24