महाराष्ट्र

Free Mobile Recharge : पंतप्रधान मोदी भारतीयांना देत आहेत 239 रुपयांचे फ्री रिचार्ज, कारण जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Free Mobile Recharge : देशात जवळपास 70 टक्के लोक हे स्मार्टफोन वापरत आहेत. अशा वेळी हे स्मार्टफोन वापरण्यासाठी रिचार्ज करणे गरजेचे असते. मात्र आधीच्या तुलनेत आता मोबाईल रिचार्ज खूप महाग झाले आहेत.

दर महिन्याला लोकांना त्यांचे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सुमारे 200-300 रुपये खर्च करावे लागतात. दरम्यान, एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीयांना मोफत मोबाईल रिचार्ज देण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल संदेश

सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होतात. यामध्ये अनेक फेक मेसेजही व्हायरल होतात, ज्याद्वारे अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचे किंवा लोकांची फसवणूक करून आर्थिक नुकसान करण्याचे काम केले जाते. आता असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची फॅक्ट चेक पीआयबी फॅक्ट चेकने केली आहे.

पीआयबीचा दावा

व्हायरल मेसेजमध्ये केलेल्या दाव्याची पीआयबी फॅक्ट चेकने सत्यता तपासली आहे. या व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भारतीय यूजर्सना 28 दिवसांसाठी ₹ 239 चे फ्री रिचार्ज देत आहेत जेणेकरून 2024 च्या निवडणुकीत अधिकाधिक लोक भाजपला मतदान करू शकतील आणि पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करता येईल.’ यासोबतच या मेसेजमध्ये खाली एक लिंकही देण्यात आली आहे.

बनावट संदेश

मात्र, पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे. ही मोफत रिचार्ज योजना भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जात नाही. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अनोळखी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिकही करू नका. हा देखील एक घोटाळा असू शकते.

Ahmednagarlive24 Office