अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तेरा व चौदा वर्ष वयाच्या दोन सख्ख्या बहिणींवर, मागील दहा महिन्यांपासून त्यांचाच एक पंचेचाळीस वर्षीय नातेवाईक वारंवार बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.
सुनिल कोंडींबा जेधे (वय- ४५, रा. भिवरी ता.पुरंदर) हे त्या तेरा व चौदा वर्ष वयाच्या दोन सख्ख्या बहिनींच्यावर मागिल दहा महिन्यांपासून वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. पिडीत मुलींच्या मोठ्या बहिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी सुनिल जेधे
याच्या विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, सुनिल जेधे यास अटक करण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल जेधे हा पंचेचाळीस इसम पत्नी व आपल्या मुलाबाळासह उरुळी देवाची हद्दीत भाड्याने राहत आहे. सुनिल जेधे हा उरुळी देवाची हद्दीतील विविध गोदामात मिळेल त्या ठिकाणी काम करुन, स्वतःची व कुटुंबाची उपजिवीका करतो.
सुनिलची पत्नीही मिळेत त्या ठिकाणी काम करुन, संसाराला हातभार लावते. दरम्यान मागिल वर्षभरापासून सुनिल जेधे यांच्या घरी, अनिता व सुनिता (दोघींचीही नावे बदलली आहेत) या अनुक्रमे तेरा व चौदा वर्षे वयाच्या दोन मुली राहण्यास आल्या होत्या.
सुनिल जेधे याने मागिल दहा महिन्याच्या काळात वरील दोन्ही मुलींना आलटुन पालटुन, उरुळी देवाची हद्दीतील विविध लॉजवर नेऊन बालात्कार केले आहेत. सुनिल जेधे हा वरील दोन्ही मुलींना लॉजवर घेऊन गेल्यावर, लैंगिक अत्याचाराबाबत सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याने दोन्ही मुली निमूटपणे सुनिल जेधे याचे अत्याचार सोसत होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved