Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Gautami Patil : बायकोची हौसच पुरी केली! बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो…

Gautami Patil : राज्यात सध्या डान्सर गौतमी पाटीलचीच चर्चा सुरू आहे. लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. अगदी बैलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील गौतम दिसू लागली आहे. यामुळे सध्या याचीच चर्चा सुरू आहे. असे असताना आता एका पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गौतमीच्या हाताने त्याने केकही कापला. त्यामुळे गावात चर्चा नाय नसती झाली तर नवलच. यामुळे याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमात लोकांना उभं राहायला जागा राहत नाही.

अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात हाणामाऱ्याही होताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. गौतमीच्या डान्सची क्रेझ इतकी की आता कोणत्याही निमित्ताने तिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला जात आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील तिचा डान्स ठेवला जात आहे.

दरम्यान, आता आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस होता. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे याची बरीच चर्चा झाली आहे.

एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

गौतमीने स्वतः त्यांना केक भरवला. गौतमी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आल्यानंतर गौतमी पाटील यांचा स्टेज शो झाला. यावेळी हजारो लोकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या प्रत्येक गाण्यावर आणि तिच्या अदाकारीवर गावकरी फेटे उडवत होते. तसेच टाळ्या आणि शिट्ट्यांची आतषबाजी सुरू होती.