Gautum adani : अदानी यांच्यासोबत ‘ती’ व्यक्ती कोण? भाजपने फोटो ट्विट करत राहुल गांधी यांना दिला करारा जवाब

Gautum adani : काल संसदेत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी दिसत होते. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. असे असताना आता भाजपने देखील एक फोटो ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटो अदानी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. मी राहुल गांधी यांना विनंती करेल की, ये रिश्ता क्या कहलाता है? याचे देखील उत्तर द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटो अदानी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत आहेत. दुसऱ्या फोटोत ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबत अदानी आहेत. तसेच तिसऱ्या फोटोत अदानी हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत दिसत आहेत.

Advertisement

यामुळे आता काँग्रेस नेते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी गौतम अदानीसोबत पंतप्रधान कितीवेळा परदेश दौऱ्यावर गेले? अदानीला कंत्राट दिल्यानंतर किती देशांचे दौरे केले? गेल्या 20 वर्षात अदानी समूहाकडून भाजपला किती देणगी मिळाली?, असे म्हटले होते.

यामुळे भाजपची संसदेत चांगलीच कोंडी झाली. एकीकडे भाजपची संसदेत कोंडी होत असतानाच आता भाजपने देखील त्यांचे फोटो ट्विट केले आहेत. यामुळे भाजपने राहुल गांधी यांना देखील आता उत्तर दिले आहे.

Advertisement