महाराष्ट्र

ST Karmachari News : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत १० हजार रुपये दिवाळी भेट द्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

ST Karmachari News : गतवर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती.

कोरोना आणि इतर संकटे पार करत सध्या एसटी महामंडळ चांगले नफ्यात आहे.

यामध्ये एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. यंदाच्या दिवाळीसाठी दिवाळी भेट म्हणून सरसकट ५००० रुपये इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर केली आहे.

मात्र सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम तुटपुंजी असून दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी त्यांना मिळणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच किमान १० हजार रुपये इतकी करावी व दिवाळी भेट म्हणून दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office