कोंब आलेली मक्याची कणसे दिली तहसीलदारांना भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

यामुळे कर्जतमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील पिकांचे पंचनामे अद्याप न झाल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्यावतीने कोंब आलेली मकाची कणसे तहसीलदार यांना भेट देण्यात आली.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्याचे पंचनामे करण्यास विलंब झाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली.

या दरम्यान चर्चेमध्ये तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी धांडेवाडी येथे समक्ष येऊन पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे येत्या काही दिवसात झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24