Pune Crime : प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Crime : कर्जफेड न केल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १५) मांजरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली.

रसिका ऊर्फराणी रवींद्र दिवटे (वय २५, रा. घोरपडी) हे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदर्श अजयकुमार मेनन (वय २५, रा. शारदा सेंटर, मांजरी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आदर्श मेनन आणि रसिका दिवटे यांचे प्रेमसंबंध होते.

रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरुन वेळोवेळी क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, तसेच लोन अॅपवरुन कर्ज काढून त्याला चार लाख रुपये दिले होते. कजार्चे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन तिले दिले होते.

मात्र, त्याने कर्ज फेडले नाही. रसिका गुरुवारी (दि. १४) रात्री त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. कर्ज फेडण्यास आदर्शने नकार दिल्याने तिने पहाटेच्या सुमारास आदर्शच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.