अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनआंदोलन उभे केले होते. महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे.
हा सर्व घोटाळा बाहेर काढणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. येत्या 15 दिवसात महावितरणने योग्य निर्णय घेऊन दिवसा शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध न केल्यास संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
पहाटे 4 ते 12, 6 ते 2, 1 ते 9, 3 ते 11 या वेळांमध्ये आम्हाला लाईट द्या. मात्र, रात्री 11 ते पहाटे 4 या कालावधीत आम्हाला वीज नको.
आमचा प्रस्ताव मांडल्यावर 15 दिवसात तज्ज्ञ कमिटी नेमतो आणि यासंदर्भात निर्णय घेतो, असं उर्जा मंत्र्यांनी सांगितलं. आम्ही सरकारवर 100 टक्के विश्वास ठेवलेला नाही.
त्यामुळं महाराष्ट्रात जनजागृती करायची, जर सरकारनं फसवलं तर जन आंदोनल करुन शेतकऱ्याला दिवसा वीज मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी म्हणाले.