महाराष्ट्र

सोयाबीन, मका तसेच खरिप पिकांना शंभर टक्के विमा द्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : दुष्काळी परिस्थितीमुळे जळालेल्या सोयाबीन व मका तसेच आदी खरिपाच्या पिकांच्या विम्याची तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी भारतीय किसान संघाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे १०० टक्के पूर्णतः जळालेल्या सोयाबीन,

मका तसेच खरिपाच्या आदी पिकांना शंभर टक्के विमा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र प्रदेश भारतीय किसान संघाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राहाता तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये सलग २१ दिवसानंतर ही पावसाने ओढ दिली आहे. त्याची पाहणी ड्रोनद्वारे झालेली आहे, असे म्हणतात त्याप्रमाणे विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे २५ टक्के आगावू विमा मिळाल्याचे आदेश आपणाकडुन दिले आहे, असे समजते.

परंतु काही खरिपाच्या पिकांची पेरणी केल्यापासून त्या पिकांना अजिबात पाणी मिळाले नाही. या मंडळात असणाऱ्या भागातील विहिरी कोरड्या ठाक असल्याने विहिरीत पाणी साठा शिल्लक नाही. शेतकऱ्यांना आता पाण्याची अत्यंत आवश्यकता असून नांदूर मध्यमेश्वर डाव्या कालव्याचे पाणी राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावे यातुन गावातील साठवण तलाव भरले जातील जेणे करून पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागेल.

या भागातील सर्वाधिक खरिपाची पेरणी केलेली सोयाबीन व मका पिके पूर्णपणे १०० टक्के पूर्ण जळून करपून गेलेली आहेत. या अवस्थेत पाऊस झाला किंवा पाटाचे पाणी मिळाले, तरी ही पाण्याच्या अभावी कोमजलेली सोयाबीन, मका पिके हिरवी होतील याची शाश्वती नाही,

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना या जळालेल्या खरिपाच्या पिकांची नांगरणी करून दुसऱ्या हंगामातील पिकांसाठी आपले रान तयार करावे लागेल म्हणून या जळालेल्या पिकांचा १०० टक्के विमा शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

म्हणून आपण ही परिस्थिती पाहता कृषी खात्यास तसा आदेश देऊन पाण्याअभावी जळालेल्या खरिपाच्या पिकांची पाहणी करून त्या जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा मंजुर करून द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर भिवाजी चौधरी,

गणेशचे संचालक, संपतराव नाथाजी चौधरी, रंगनाथ चौधरी, गंगाधर एलम, अण्णासाहेब रंगनाथ चौधरी, एकनाथ निर्मळ, मच्छिंद्र जगन्नाथ चौधरी, बाळासाहेब प्रल्हाद चौधरी, बापुसाहेब गंगाधर चौधरी, महेंद्र मुरलीधर चौधरी, अण्णासाहेब गंगाधर चौधरी आदी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.

Ahmednagarlive24 Office