प्लास्टिक बाटल्या द्या मोबाईल रिचार्ज मिळवा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे. 

त्यानुसार जर प्रवाशांनी टाकाऊ बाटली स्थानकावरील क्रशिंग मशिनमध्ये टाकली तर त्यांना मोफत मोबाईल रिचार्ज करून दिला जाणार आहे. परंतु हा रिचार्ज नेमका किती रुपयांचा असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

भारतीय रेल्वेकडून जवळपास ४०० बाटली क्रशिंग मशिन देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर बसवले जाणार आहेत. ज्या प्रवाशांना या मशिनचा वापर करायचा असेल त्यांना सर्वप्रथम त्यामध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर टाकाऊ बाटली त्यामध्ये टाकता येइल. 

बाटली फेकल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावर रेल्वेकडून मोफत रिचार्ज मारला जाईल. लोकांमध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रोत्साहन निर्माण व्हावे, या दृष्टिकोनातून रेल्वेकडून ही नवीन योजना लागू केली जाणार आहे. 

मात्र, याबाबतची अधिक माहिती अद्याप देण्यात आली नाही. सद्यस्थितीत देशातील १२८ रेल्वे स्थानकावर १६० बाटली क्रशिंग मशीन उपलब्ध आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली. 

याशिवाय रेल्वेतील सर्व कर्मचाऱ्यांना टाकाऊप्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या पुनर्वापरासाठी पाठवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24