Maharashtra News : सरकारला सद्बुद्धी द्या आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू द्या, असे साकडे मनोज जरांगे पाटील यांनी साईबाबांना घातले. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी शिर्डीत साई मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले व साई चरणी लीन झाले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राहाता येथील सभा आटोपल्यानंतर काल रविवारी दुपारच्या सुमारास शिर्डी येथील साई मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कैलासबापू कोते, कमलाकर कोते, बाबासाहेब कोते, ताराचंद कोते, नितीनभाऊ कोते, सुजित गोंदकर, दत्तात्रय कोते, सचिन चौगुले, रवींद्र गोंदकर, विकास गोंदकर, दशरथ गव्हाणे, भारत चांदोरे, अनिल बोठे, ताराचंद कोते, विरेश बोठे,
सचिन चौगुले, चंद्रशेखर, अक्षय सदाफळ, अक्षय बोठे, विशाल बोठे, पंकज शिंदे, सुरज गायकर, केदार बाबर, मयुरेश कारले, वैभव कोते, साई कार्ले, ऋषिकेश कापसे, बबलू निरगुडे, निलेश पवार, पुष्पक खापटे यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
साई दर्शनानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, साईबाबांनी दिलेला श्रद्धा व सबुरी संदेश आम्ही जपतो. त्यामुळे श्रद्धा ठेवली सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला आणि सबुरी आहे.
म्हणूनच शांततेत आंदोलन सुरू आहे व यापुढेही राहील आता साईबाबांकडे या सरकारला सद्बुद्धी देण्याची व मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याची प्रार्थना केली आहे. जिथे अन्याय होतो. तिथे बाबा मार्ग व आशिर्वाद देतात. या संवाद यात्रेनिमित्त आरक्षण प्रश्नी मराठा समाजबांधवांच्या वेदना लक्षात येत आहेत.
रात्री तासंतास तसेच दिवसा भर उन्हात बसून माझ्या संवाद यात्रेला लोक थांबतात. या वेदना सरकारने समजावून घेऊन मराठा आरक्षण देऊन या प्रश्नाला पूर्णविराम दिला पाहिजे.
ओबीसी समाज आमचे बांधवच आहेत सर्वसामान्य ओबीसी बांधवांचे मराठा आरक्षणा संदर्भात म्हणणे नाही. मात्र काही नेतेमंडळी या प्रश्नी रोष ठेवतात. आम्ही कुणाच्या आरक्षणाला विरोध करत नाही.
मात्र आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे व ते राज्य सरकारने द्यावे. आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे भाव व इतर समस्यांवरही आवाज उठवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.