ग्लोबल शिक्षक डिसले गुरुजी यांचा अखेर राजीनामा

Maharashtra news : सोलापूरचे आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. सतत गैरहजर राहिल्याने सोलापूर झेडपी ने त्यांच्या विरुद्ध कारवाई ची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्या पूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ७ जुलै २०२२ रोजी राजीनामा सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याला दुजोरा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डिसले यांच्याबाबत चौकशी अहवाल तयार केला आहे. शिक्षण विभागाने हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे शिक्षण विभागाने दिला आहे. कारवाई होण्याअगोदर डिसले यांनी राजीनामा दिला. तो मंजूर व्हावा, असे पत्र गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दिले आहे