अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. पंतप्रधान मोदी सिरमच्या लस निर्मितीचा आढावा घेत आहेत. यावरुन सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना चांगलाच टोला लगावला एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे.
ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला तर गैरसमज करु नये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला.
या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही.
तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved