ऑफिसमध्ये जाऊन पत्नीचा चाकूने सपासप वार करून पतीने केला खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीत किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा कार्यालयात जाऊन चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना गुरुवारी भरदिवसा घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

कीर्ती रविकुमार पोटे (४३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रवी कुमार पोटे (५०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दांपत्य डहाणूकर कॉलनीत २३ वर्षाच्या मुलीसोबत राहतात. गुरुवारी दुपारच्या कीर्ती पोटे या त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात आलेल्या रविकुमार पोटे याने चाकूने किर्ती पोटे यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या कीर्ती यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या खूना मागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली आहे. आरोपी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24