अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते.
परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे.
गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू आहे. परंतु काल सोन्याच्या भावात वाढ झाली. 9 ऑक्टोबर रोजी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमला 349 रुपयांनी वाढून 50357 रुपये झाले.
दुसरीकडे चांदीचा दर किलोमागे 351 रुपये वाढ नोंदविला जात आहे. चांदीची स्पॉट किंमत (सरासरी) प्रति किलो 60685 रुपये झाली आहे.
सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमती ह्या प्रमाणे :- देशाच्या एकूण बाजारपेठेवर नजर टाकल्यास इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 50718 रुपयांवर पोचले आहेत.
23 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50515 रुपयांवर पोहोचली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46458 रुपयांवर पोहोचली आहे,
तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 38039 रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 60685 रुपये झाला. आयबीजेएने दिलेला दर सर्वत्र स्वीकारला आहे.
मात्र, या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता.
जागतिक स्तरावर सोन्याचे भाव :- ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींबद्दल बोलताना डिसेंबर 2020मध्ये सोन्याच्या किमती 17 डॉलर अर्थात 0.90 टक्क्यांनी वाढून 1912 .10 डॉलर प्रति औंस होता.
त्याचवेळी स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 13.45 डॉलर म्हणजेच 0.71 टक्क्यांनी वधारला. ब्लूमबर्गच्या मते, कॉमेक्सवरील डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट चांदीची किंमत
0.47 किंवा 1.96 टक्क्यांनी वाढून 24.35 डॉलर प्रति औंस झाली. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रतिऔंस 0.32 डॉलर म्हणजेच 1.35 टक्क्यांनी वधारत 24.16 डॉलर प्रति औंस होता.
दिवाळीला येऊ शकते तेजी :- यावर्षी दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्याची किंमत पुन्हा वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या अंदाजानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, चांदीची किंमत 80 हजारांवर जाऊ शकते.
त्यांच्या मते, सध्या सोन्याच्या किंमती अल्पावधीतच घसरताना दिसतील, परंतु या वर्षाच्या अखेरीस सोन्याला वेग येईल आणि या दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतील.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved