महाराष्ट्र

Gold Jewelery : तुमच्या घरात असणार सोनं किती शुद्ध आहे? जाणून घ्या 24 कॅरेटपासून ते 14 कॅरेट सोन्यातील फरक

Gold Jewelery : आज अक्षय्य तृतीया आहे. अशा वेळी लोक मोठ्या प्रमाणात सोने किंवा चांदी खरेदी करत असतात. मात्र दागदागिने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सोन्याच्या फरकांबद्दल माहित असणे गरजेचे आहे.

सोन्याच्या गुणवत्तेनुसार बरेच लोक धोका खातात. सोनं जास्त चांगलं किती कॅरेटचं असतं हेच लोकांना अजूनही ओळखता येत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या गुणवत्तेबद्दल सांगणार आहे.

सोन्याच्या गुणवत्तेचं मोजमाप कशा प्रकारे करतात?

सोन्याची गुणवत्ता ही कॅरेटमध्ये मोजतात. सोने जेवढे जास्त शुद्ध असेल तितके ते अगदी सहजपणे वाकले जाऊ शकते. सोन्यापासून वेगवेगळ्या आकारात दागिने बनवले जाऊ शकतात. सोन्यापासून बनवलेल्या वस्तू सहज तुटू नयेत अथवा लवकर खराब होऊ नये म्हणून तिच्यापासून बनवलेल्या वस्तूला बळकट बनवण्यासाठी त्यामध्ये इतर धातू मिसळले जातात.

सोनं वेगवेगळ्या कॅरेटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतं. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या सोन्याची निरनिराळी स्पेशलीटी असते. आज आपण या पोस्टमधून सर्व प्रकारच्या सोन्याविषयी जाणून घेणार आहोत.

24 कॅरेट सोनं

24 कॅरेट सोने हे 99.99 टक्के शुद्ध सोने असते. या प्रकारच्या सोन्यामध्ये इतर कोणताही धातू मिसळला जात नाही. हे सोन्याचे असणारे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. सोन्याच्या गुणवत्तेमुळे, या प्रकारच्या सोन्याची किंमत सर्वात जास्त आहे.

नाणी अथवा बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. त्याच बरोबर मेडिकल तसेच इलेक्ट्रॉनिक अनुप्रयोगांमध्येही या प्रकारच्या सोन्याचा वापर केला जातो.

22 कॅरेट सोनं

22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्धता असते. बाकीचे 8.33 टक्के हे इतर धातूंचं मिश्रण त्यामध्ये असतं. हे मिश्रण 22 कॅरेट सोन्यात मिसळे जाते. या मिश्रणामध्ये चांदी व तांबे प्रामुख्याने वापरण्यात येतय. 22 कॅरेट सोने सुध्दा शुद्ध सोने समजले जाते.

मात्र हे सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी प्रमाणात शुद्ध आहे. आपण वापरत असलेले सोन्याचे दागिने 22 कॅरेट सोन्यापासून बनविण्यात येतात. मात्र सोन्याचे दागिने हे काही विशेष प्रसंगीच घातला जातो. कारण सोने हा धातू खूपच मऊ आणि वजनाने हलका असतो.

18 कॅरेट सोने

या प्रकारच्या सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने तसेच 25 टक्के तांबे व चांदीचे मिश्रण वापरले जाते. 18 कॅरेट सोन्यात या घातलेल्या मिश्रणामुळे कडकपणा जास्त वाढतो. यामुळे ते दैनंदिन जीवनात आपण परिधान करून वापरू शकतो. या प्रकारच्या धातूपासून प्रामुख्याने अंगठ्या बनविल्या जातात.

14 कॅरेट सोने

14 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंची भेसळ मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये फक्त 58.3 टक्के शुद्ध सोने वापरले आहे. बाकीचे 41.7 टक्के निकेल, चांदी, झिंक या प्रकारच्या धातूचे मिश्रण आहे.

सर्वोत्तम सोनं कोणतं?

आपल्याला वापरण्यासाठी सोन्याचा कोणताही प्रकार दागिन्यांसाठी सर्वोत्तम नाही. वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्यामध्ये वेगळी वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे आहेत यावर ते अवलंबून आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts