माझ्या सुनेने दागिन्यांची चोरी केली ! पोलिसात सासऱ्यांनी दाखल केली तक्रार …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सून, तिचे आई-वडील आणि मामा यांनी आपल्या ताब्यात असलेल्या हॅण्ड बॅगमधून एक लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली,

हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ ! 

अशी तक्रार शामप्रसाद ईश्वनाथ देव (वय ७३, व्यवसाय वकिली, रा. विश्वकमल, राम मंदिराच्या पाठीमागे, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत दाखल केली आहे.

हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन 

याप्रकरणी सून मंजिरी शार्दूल देव, आई लताबाई गौतम जोशी, वडिल गौतम जोशी, मामा भूषण अनंत जोशी (सर्व रा. सुभद्रानगर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- माजी महापौर संदिप कोतकर व सचिन कोतकर यांना जामीन मंजूर !

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ ऑक्टोबर २०१९ रोजी वरील आरोपींनी फिर्यादी देव यांच्या घरातून त्यांच्या हॅण्ड बॅगमधून एक लाख १९ हजार रुपये त्यात

हे पण वाचा :- अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …

९९ हजार रुपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, २० हजार रुपये रोख व मौल्यवान वस्तू, बँकेचे पासबुक व महत्त्वाची कागदपत्रे असे लबाडीच्या इराद्याने संगनमताने चोरून नेले.

हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

याप्रकरणी देव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांत गु. र. नं. १६/२०२० भा. दं. वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक भरत नागरे करीत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24