महाराष्ट्र

Gold loan : आता लगेच मिळेल गोल्ड लोन ! फक्त भारतीय स्टेट बँकेत अशा पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय

Published by
Ahmednagarlive24 Office

Gold loan : महत्वाच्या कामाला कर्ज घेणे हे खूप गरजेचे असते. अशा वेळी जर तुम्हाला आपत्कालीन स्थितीत लोन घ्यायचे असेल तर तुम्ही सोने तारण कर्ज घेऊ शकता.

यामध्ये आपण आपले सोन्याचे दागिने अथवा नाणी बँकेत ठेवून त्याच्या बदल्यात लोन घेऊ शकता. हे कर्ज आपण ठेवलेल्या आपल्याला नाण्यांच्या अथवा दागिन्यांच्या किमतीच्या काही भागाच्या आधारे दिले जाते.

भारतीय स्टेट बँक देते सोने तारण लोन सुविधेचा लाभ-

भारतातील सर्वात मोठी असलेली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सोने तारण कर्ज सुविधा देते. इतर बँकांनी विकलेली सोन्याची नाणी अथवा आपल्याकडील दागिने तारण ठेवून ग्राहक स्टेट बँकेकडून गोल्ड लोन घेऊ शकतात.

भारतीय स्टेट बँकेकडून आपल्याला जास्तीत जास्त 50 लाख आणि किमान 20 हजार रुपयांपर्यंत सोने कर्ज घेता येते. सोने तारण कर्ज माध्यमातून सोन्याचे दागिने तारण ठेवावे लागतात. आपण 31 मार्च 2023 अगोदर सोने खरेदी केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फिस द्यावी लागणार नाही.

कोणाला मिळते सोने तारण कर्ज

भारतीय स्टेट बँकेकडून हे गोल्ड लोन फक्त 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्तींनाच मिळू शकते. त्याच बरोबर, सोने तारण कर्ज अशा लोकांनाच दिले जाते ज्यांच्याकडे काहीतरी उत्पन्नाचा स्थिर स्रोत आहे. तसेच ते पेन्शनधारक आहेत.

सोने घेतल्या नंतर पुढील काही महिन्यापासून प्रिंसिपल अमाउंट आणि व्याजदराचे पेमेंट चालू होते. लिक्विड सुवर्ण कर्ज मध्ये ओव्हरड्राफ्ट अकाउंट सोबतच आपल्याला ट्रांझेक्शनची सुविधा मिळेल. सोने तारण कर्ज मध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला व्याज भरावे लागते. बँकेकडून वेळोवेळी सोन्याचे मूल्यांकन करण्यात येते.

सोने तारण कर्ज साठी आवश्यक कागदपत्रे –

आपला फोटो जोडलेला गोल्ड लोन अर्ज

आपल्या पत्त्याच्या पुराव्या सोबतच ओळखपत्र त्याच बरोबर कर्ज घेणार निरक्षर असल्यास साक्षीदार यांचा समावेश आहे.

कर्ज वाटपाच्या वेळी, आपल्याला डिमांड प्रॉमिसरी नोट तसेच डीपी नोट डिलीवरी लेटर

सोन्याच्या दागिन्यांचे असलेली डिलीवरी लेटर, अरेंजमेंट लेटर तसेच कर्ज मंजूरीच्या वेळी मिळालेले हार्ड लेटर आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

आपल्याला कसं करता येईल अप्लाय?

सोने तारण कर्ज अप्लाय करण्यासाठी आसपल्याला अगोदर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटच्या लोन सेक्शन मध्ये जावे लागणार आहे.

या ठिकाणी आपल्याला गोल्ड लोन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर आपल्या समोर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

या ठिकाणी आपल्याला SBI Personal Gold Loan या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

त्या नंतर स्क्रिवर Apply Now असा पर्याय दिसेल.

जिथे क्लिक करून आपण सोने कर्ज करता अर्ज करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Gold Loan