Gold Price in India : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्यामोठ्या घोषणा केल्या आहेत. आजपासून आर्थिक वर्ष बदलले असून सरकारने घेतलेल्या या निर्णयांचा थेट परिमाण लोकांवर दिसणार आहे.
दरम्यान, आज सोन्याच्या दागिन्यांबाबत सरकारकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक HUID’ (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) प्रणाली लागू करण्याच्या एक दिवस आधी, सरकारने ज्वेलर्सना मोठा दिलासा दिला आहे. वास्तविक, भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 1 एप्रिलपासून हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक’ HUID अनिवार्य केले आहे.
सोन्याचे दागिने
सरकारने शुक्रवारी सुमारे 16,000 ज्वेलर्सना जूनपर्यंत ‘घोषित’ सोन्याचे जुने हॉलमार्क केलेले दागिने विकण्याची परवानगी दिली आहे. अशा प्रकारे तीन महिने अजून सूट मिळाली आहे. मात्र, ही सूट केवळ जुलै 2021 पूर्वी बनवलेल्या दागिन्यांवर लागू असेल. याबाबत ज्वेलरी उद्योगाच्या संस्थांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी आणि गोल्ड आर्टिफॅक्ट्स ऑर्डर, 2020 मध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सनी यापूर्वी त्यांच्या जुन्या हॉलमार्क केलेल्या दागिन्यांचा स्टॉक केला होता त्यांना त्यांची विक्री करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर ते त्यांची विक्री करू शकणार नाहीत.
अतिरिक्त वेळ
मंत्रालयातील अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, देशात 1.56 लाख नोंदणीकृत ज्वेलर्स आहेत, त्यापैकी 16,243 ज्वेलर्सनी या वर्षी 1 जुलै रोजी त्यांचे जुने हॉलमार्क केलेले दागिने बाहेर काढले आहेत.
त्यांना तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. ही शेवटची मुदत असून या वेळेत तुम्हाला तुमचे जुने दागिने बाहेर काढावे लागणार आहेत. अन्यथा आणखी वेळ दिला जाणार नसल्याचे खरे यांनी सांगितले आहे.