Gold Rates Today : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीचे दर अस्थिर आहेत. यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
आज सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तसेच जागतिक सोन्याच्या बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्याची आपल्याला दिसत आहे.
या घसरणीचा परिणाम सोन्याच्या बाजार पेठेत सुद्धा दिसून येत आहे. MCX सोनं एप्रिल फ्युचर्स 139 रुपयांनी वाढून 59,595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार होताना दिसत आहे. चांदीचा मे फ्युचर्स 106 रुपयांनी वाढून 70, 478 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे.
मागील ट्रेडिंग भागात सोन्याचा एप्रिल फ्युचर्स हा 59,734 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी स्थिर झाला होता. तर चांदीचा मे वायदा 70,584 रुपये प्रतिकिलोवर थांबला होता.
जागतिक मार्केट मध्ये सोन्याच्या दरात आज घट झालेली दिसून येतेय. स्पॉट गोल्ड 4.06 डॉलर ने कमी होऊन 1,967.91 डॉलर प्रति औंसवर व्यवहार होताना दिसत होत. स्पॉट सिल्व्हर 0.11 डॉलर च्या घट बरोबरच 23.23 डॉलर प्रति औंस आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील सोन्याचा आजचा दर
मुंबई, कोलकाता, विजयवाडा, भुवनेश्वर, कटक, अमरावती, गुंटूर,हैदराबाद, केरळ, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूरातील 22 कॅरेट सोन्याचा दर 54,490 रुपये प्रति 10 ग्राम आहे. तर दिल्ली मधील 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 54,640 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील चांदीचा दर
मुंबई, दिल्ली, जयपूर, लखनऊ, नागपूर, चंदीगड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर , कोलकाता, पुणे, वडोदरा, अहमदाबाद, आणि लातूर या ठिकाणी चांदीचा दर 73,000 रुपये प्रति किलोसाठी आहे.