अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.
मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. तसेच अनेक परीक्षा रद्द झाल्या, यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बेरोजगार तरुण चांगलेच चिंतेत होते.
मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.
कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved