अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज : ‘त्या’ पहिल्या कोरोना रुग्णाचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह डॉक्टर म्हणाले आता…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज आहे कारण अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचे तीन रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.

या रुग्णाची प्रकृती पाहता हा अहवालही निगेटीव्ह येईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे यांनी दिली आहे.

नगरमधील तिन्ही कोरानाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून पहिल्या रुग्णांची ७ आणि पुन्हा १४ दिवसांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे.

१४ दिवसांनंतर अंतिम चाचणी २४ तासानंतर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

त्याचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास पहिल्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल, असे बोरगे यांंनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24