अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते.
परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे.
गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू आहे. सोमवारी सोन्याचे दर प्रति तोळा 194 तर चांदीचे दर प्रति किलो 933 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे भाव प्रति तोळा 50,449 रुपये झाले आहेत. तर चांदी देखील 60 हजारांच्या खाली येत दर 59,274 रुपये प्रति किलो झाले आहेत.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोमवारी रुपयाचे मुल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 18 पैशांनी घसरून 73.79 वर आले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी क्रमश: 1857 डॉलर प्रति औंस आणि 22.70 डॉलर प्रति औंस होते. स्पॉट किंमतीत घसरण झाल्यामुळे व्यावसायिकांनी त्यांचा जमा सौदा कमी केला, परिणामी वायदे बाजारात सोन्याचे दर 0.28 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यानंतर सोन्याचे दर 49,520 रुपए प्रति तोळावर आले आहेत.
काय म्हणतात तज्ज्ञ :- कमोडिटी अँड करन्सी सेगमेंटचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते सोन्याचा दर काही काळासाठी कमी होऊ शकतो. दिवाळीच्या आसपास सोन्याच्या किंमती पुन्हा वाढतील. मागणी वाढल्यानंतर सोने पुन्हा 52000 रुपयांच्या जवळपास जाईल. डिसेंबरच्या अखेरीस, सोन्याचे दर 56000 पर्यंत जावू शकते. आता सोन्याचे दर ४७००० -४८००० रुपयांवर येण्याची शक्यता आहे.
दिवाळीला येऊ शकते तेजी :- यावर्षी दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्याची किंमत पुन्हा वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, चांदीची किंमत 80 हजारांवर जाऊ शकते. त्यांच्या मते, सध्या सोन्याच्या किंमती अल्पावधीतच घसरताना दिसतील, परंतु या वर्षाच्या अखेरीस सोन्याला वेग येईल आणि या दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतील.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved