शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज वाटपास 15 दिवसांची मुदतवाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे.

दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे,

2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती.मात्र आता बँकेने पीककर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

बँकेने या कर्ज वाटपाच्या वाढवून दिलेल्या मुदतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेण्याचे अवाहन चेअरमन गायकर पाटील यांनी केले असून बँकेने शेतकरी व शेती विकास हा केंद्रबिंदू मानून बँक नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घेत आहे. बँकेने 2 लाख 90 हजार 985

शेतकरी सभासदांना रक्कम रुपये 1 हजार 769 कोटीचे वाटप केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर, व्हा.चेअरमन वाघ व ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे.

दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे,

2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. मात्र आता बँकेने पीककर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर,

व्हाईस चेअरमन रामदास वाघ व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. बँकेने या कर्ज वाटपाच्या वाढवून दिलेल्या मुदतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेण्याचे अवाहन चेअरमन गायकर पाटील यांनी केले असून बँकेने शेतकरी व शेती विकास हा केंद्रबिंदू मानून बँक नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घेत आहे.

बँकेने 2 लाख 90 हजार 985 शेतकरी सभासदांना रक्कम रुपये 1 हजार 769 कोटीचे वाटप केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर, व्हा.चेअरमन वाघ व ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24